लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग १
लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग १ कायदेशीर कागदपत्रे हा अनेक ठिकाणी लागणारी आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. अगदी जन्मापासून सुरु झालेला हा कागदपत्रांचा सिलसिला मृत्यूनंतर मृत्यू-दाखला मिळाल्यावरच संपतो. जर लहानपणीच मुलांची सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार करुन ठेवली तर शाळेच्या प्रवेशापासून अगदी परदेशगमनापर्यंतच्या बहुतांश गोष्टी करताना वेळ वाचेल व इतर अडचणींचा सामनाही करावा लागणार नाही. १. जन्म-दाखला: बाळाच्या जन्मानंतर त्याच्या जन्माची नोंद जन्म-मृत्यू कार्यालयात करणे आवश्यक आहे. या जन्मदाखल्यावर- - बाळाचे संपूर्ण नाव - आई व वडिलांचे संपूर्ण नाव - बाळाचे लिंग - बाळाची जन्मतारीख . - जन्मठिकाण . या सर्व गोष्टींची नोंद केलेली असते. जन्मदाखला ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात पहिले व सर्वात महत्वाचं कागदपत्र आहे. जन्मदाखला शाळेचा प्रवेश, आधार कार्ड नोंदणी, पासपोर्ट, बॅंक अकाउंट ओपनिंग, इत्यादी सर्व ठिकाणी मागितले जाते.. नोंदणी: बाळाच्या जन्मानंतर २१ दिवसांच्या आत हॉस्पिटल, संस्था अथवा कुटुंबातील सदस्याकडून जन्म-मृत्यू कार्यालयात बाळाच्या जन्माची नोंद करावी लागते. द...